BJP Leaders Meeting : मोदी, शाह, नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप निवडणूक समितीची पाच तास बैठक
BJP Leaders Meeting : मोदी, शाह, नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप निवडणूक समितीची पाच तास बैठक
नवी दिल्लीत सध्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे. बैठक खरंतर संध्याकाळी सात वाजता सुरू होणार होती. मात्र जेपी नड्डा आणि अमित शाहांची पंतप्रधान मोदींसोबत पाच तास बैठक सुरू होती. त्यामुळे त्यांना भाजप मुख्यालयात पोहोचायला रात्रीचे साडे दहा वाजले. त्यानंतर १५ मिनिटांनी म्हणजेच पावणे दहाच्या सुमाराला मोदी दाखल झाले. ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे, कारण भाजपची पहिली यादी या बैठकीनंतर जाहीर होणार आहे. यामध्ये मोदी, शाह, नड्डा, राजनाथ, नितीन गडकरी यांचा समावेश असणार आहे. म्हणजे जे नेते निवडणूक लढवणार याबाबत काहीच शंका नाही, अशांची नावं या यादीत असणार आहेत. तसंच, महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व २३ खासदारांचा देखील फैसला होणार आहे.























