Sourav Ganguly: विराटने न ऐकल्यामुळं एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही काढून घ्यावं लागलं - गांगुली
विराट कोहलीकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर सोशल मीडियावरुन बीसीसीआयवर टीका करण्यात येतेय. मात्र आता याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं स्पष्टीकरण दिलंय. टी-२०चं कर्णधारपद सोडण्यापासून विराटला रोखलं होतं. मात्र त्याने ऐकलं नाही आणि त्यामुळे त्याच्याकडून वनडेचं कर्णधारपदही काढून घ्यावं लागलं असं गांगुलीनं सांगितलं. टी-२० आणि वनडेसाठी वेगळा कर्णधार असू नये ही निवड समितीची भूमिका आहे. त्यामुळेच बीसीसीआय आणि निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतल्याचं गांगुलीनं म्हटलंय. या संदर्भात निवड समितीनं आणि बीसीसीआय अध्यक्ष म्हणून आपण विराटशी संवाद साधल्याचंही गांगुलीने सांगितलंय. वनडे क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवताना दिलेल्या योगदानाबद्दल गांगुलीनं कोहलीचे आभारही मानलेत.






















