Dhule Fire : चिखलीपाडा गावात मेणबत्तीच्या कारखान्याला आग, 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू
धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावामध्ये एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीर रित्या भाजल्या आहेत. वाढदिवसानिमित्त वापरले जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनवली जात होती. यादरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली आणि या आगीत घोरपडून या चौघ महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चौकशीतच आगीच नेमकं कारण समोर येणार असल्याच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितल आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतल असून, जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एक अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याने त्या संदर्भातही पोलीस तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या


















