Dhule Dispute: सांगवी वाद प्रकरणात 13 जणांना अखेर अटक;14 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
Dhule Dispute: सांगवी वाद प्रकरणात 13 जणांना अखेर अटक;14 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधील सांगवी गावात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर दगडफेक आणि गाड्याची तोडफोड झाली.याप्रकरणी दीडशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील १३ जणांना अखेर अटक करण्यात आलीये. त्यापैकी १० जणांना शिरपूर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यातील 65 जणांची ओळख पटली नाहीये. तसंच इतरांचा शोध सध्या सुरु आहे. 14 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे . आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याने शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात दोन गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळीचा प्रयत्न झाला होता. मात्र परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी गावात अजुनही पोलीस बंदोबस्त तैनात आहे.


















