Crop Insurance : पावसाअभावी झालेल्या नुकसानाची भरपाई नाही? पीकविमा कंपन्यांचं शेतकऱ्यांना अजब उत्तर
एकीकडे पावसानं ओढ दिल्यानं डोळ्यादेखत उभी पिकं करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हताश होऊन विमा कंपन्यांकडे पदर पसरतोय...मात्र त्यांच्या पदरी निराशा पडतेय... संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीनचे नुकसान झाल्यानं नुकसान भरपाईची मागणी कंपनीकडे केली... तसेच निपाणी गावातीलही एका शेतकऱ्याने कंपनीकडे असाच फोन केला. मात्र, पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार नसल्याचं अजब उत्तर शेतकऱ्यांना देण्यात आले. यावर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी 21 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास पीक विमा द्यावा लागणार असल्याचं म्हटले आहे... शिवाय प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पावसामुळे पिकं करपू लागल्यास त्याचा विमा मिळत नाही अशी माहिती कॉल सेंटरवरून मिळालीय. त्यामुळे, पीकविमा शेतकऱ्यांना गंडवतायत की सरकार, असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारू लागलेयत.