Kishtwar : किश्तवाड ढगफुटीमध्ये आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, बचाव कार्य अजूनही सुरू
Kishtwar Cloudburst Updates : किश्तवाडामध्ये बचाव कार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परिस्थितीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुला लक्ष ठेऊन आहेत.

Kishtwar Cloudburst Updates : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती गावात भीषण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींना अठोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बचाव कार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांसह लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून अनेक गावे या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्वतः रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.
हेल्पलाइन आणि नियंत्रण कक्ष
प्रशासनाने पद्दार येथे यात्रेकरूंसाठी नियंत्रण कक्ष आणि सहाय्यता डेस्क उभारला आहे. पाच अधिकाऱ्यांना या कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. चशोती हे माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील शेवटचे गाव आहे, जिथे हजारो भाविक यात्रेसाठी जमले होते.
घटना कधी घडली?
गुरूवारी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. त्यावेळी यात्रेकरूंनी मंदिराकडे जाणारी 8.5 किमीची पायी वाटचाल सुरू करण्याची तयारी सुरू होती. या ठिकाणी पूर आल्यानंतर अनेक यात्रेकरू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
पंतप्रधान मोदींची मृतांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (Twitter) वरून शोक व्यक्त करताना म्हटले की, "किश्तवाडमधील ढगफुटी आणि पुरामुळे प्रभावित सर्वांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. बचाव कार्य सुरू असून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल."
My thoughts and prayers are with all those affected by the cloudburst and flooding in Kishtwar, Jammu and Kashmir. The situation is being monitored closely. Rescue and relief operations are underway. Every possible assistance will be provided to those in need.
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2025
हवामान विभागाचा इशारा
हवामान खात्याने जम्मू-काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांत पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी ढगफुटी, अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका वर्तवला आहे. बचाव कार्याला 20 दिवस लागू शकतात, असा अंदाज प्रशासनाने दिला आहे.
🚨 #Chesoti Cloudburst – Rescue Ops Update | DISTRICT POLICE KISHTWAR*
— DISTRICT POLICE KISHTWAR (@SSPKishtwar) August 14, 2025
Rescue operations continue in Chesoti, Tehsil Atholi, District Kishtwar. *DGP J&K Police Sh. Nalin Prabhat-IPS* is personally monitoring the situation on the ground.
✅ 80 injured persons rescued
🚑 Several… pic.twitter.com/fHFoBynd34
ही बातमी वाचा:























