एक्स्प्लोर

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech : मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून GST कमी करण्याचे संकेत; लाल किल्ल्यावरून देशवासियांना म्हणाले, या दिवाळीत...

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले.

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2025) पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले.  

नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या दिवाळीत तुम्हाला खूप मोठी भेट मिळेल. आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार आहोत. दिवाळीत ही तुमची भेट ठरेल. सामान्य माणसाचे कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. 

पंतप्रधान विकसित भारत योजना आजपासून सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, देशातील तरुणांनो, आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज १५ ऑगस्ट आहे. आजपासूनच माझ्या देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना राबवली जात आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून सुरू होत आहे. तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

आपल्याला सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचंय : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार करावेत. आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. सध्या आपण खतांसाठी (फर्टिलायझर) इतरांवर अवलंबून आहोत. चला आपण खतांचा साठा करून ही अवलंबित्वाची गरज संपवू. आगामी काळात ईव्ही बॅटरीचा युग सुरू होईल. आपण त्या बॅटऱ्याही बनवू. आम्हाला आमच्या तरुणांवर पूर्ण विश्वास आहे. गेल्या 11 वर्षांत उद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे. आज लाखो स्टार्टअप्स देशाला बळ देत आहेत," असे त्यांनी म्हटले. 

ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, आजचा दिवस एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे. मला खूप अभिमान वाटतोय की, लाल किल्ल्वरून मला ऑपरेशन सिंदूरमधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या वीरांनी अशा प्रकारे हे क्षण घडवले की, ते कल्पनेपलीकडचं होतं. ही घटना अशी होती की, पहलगाममध्ये सीमा पारून आलेल्या अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला. लोकांचा धर्म विचारून, ओळखून त्यांची हत्या केली गेली. संपूर्ण हिंदुस्थान या घटनेनंतर संतापलेला होता. आपल्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. पाकिस्तानमध्ये जे काही घडलं, त्याचा परिणाम इतका प्रचंड होता की, आजही रोज नवनवे खुलासे होत आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

आणखी वाचा 

Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही; नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन ठणकावले, काय काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget