Ambadas Danve on Nitesh Rane : नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले कळलं नाही
Ambadas Danve on Nitesh Rane : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अडचणीत येत असल्याचं वारंवार दिसून येतं. अशातच धाराशिवमध्ये केलेल्या त्या वक्तव्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे. नितेश राणेंच्या (Nitesh Rane) वक्तव्याचे पडसाद काल (मंगळवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना, नितेश राणेंनी (Nitesh Rane) तेथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसलेला आहे, असे वक्तव्य केलं त्याला आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण?, असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिला. राणेंच्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत डिवचलं आहे.
























