(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole Bhandara Banner : नाना पटोले बनणार मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष; भंडाऱ्यात झळकले बॅनर्स
Nana Patole Bhandara Banner : नाना पटोले बनणार मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष; भंडाऱ्यात झळकले बॅनर्स काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना माझगाव क्रिकेट क्लब नं सदस्यत्व दिलं आहे. त्यामुळं नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झालीय. अशात भंडाऱ्यात नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनणार असल्याच्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. भंडारा जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती मदन रामटेके यांनी लावलेल्या बॅनरवर....ये वादा रहा, आमच्या भंडाऱ्याचा नाना भाऊ पटोले बनेल मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष. शेतकरी पुत्र ते भावी मुख्यमंत्री, यात जोडली जाणार क्रिकेटच्या इतिहासाची सुवर्ण अक्षरानं नोंद.... या आशियाचे हे बॅनर भंडारा शहरात ठिकाणी लावले आहेत. या बॅनरवर नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनणार असं नमूद आहे. नानांच्या या बॅनरमुळे आता नाना मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढतील या चर्चेला आता सुरुवात झाली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी....