TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 Noon
TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 Noon
ही बातमी पण वाचा
आय कॉन्टॅक्ट टाळला, केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना नमस्कार; मुख्यमंत्रीपदावरुन फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा, VIDEO आला समोर
मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळालं. या यशानंतर महायुतीत सध्या सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केला जातोय. मात्र मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये सध्या धुसफूस चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. तर दुसरीकडे सर्वांत मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजपादेखील मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. याच कारणामुळे या दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांत नाराजी दिसून येत आहे.
कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टाळलं?
मुंबईतील अतिरेकी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली करण्याच्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान, या दोन्ही नेत्यांत काहीसा दुरावा असल्याचं दिसलं. या कार्यक्रमातील दृश्य पाहून हे दोन्ही नेते एकमेकांना टाळत असल्याचं बोललं जातंय. त्यांची देहबोली पाहून असा दावा केला जातोय. मुख्यमंत्रिपद हे यामागचं मुख्य कारण आहे का? असं हे दृश्य पाहून विचारलं जातंय.
एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी दबाव?
महायुतीत भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र लढले. विधानसभा निवडणुकीला ते एकदीलाने सामोरे गेले. त्याचा परिणाम म्हणून महायुतीला या निवडणुकीत बहुमत मिळालं. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे तिन्ही नेते एकत्र आले होते. त्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी या नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत होतं. मात्र गेल्या दोन दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठी दबाव टाकला जात असल्याचं बोललं जातंय. शिंदे यांच्या आमदारांकडूनही हीच भावना व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपा मात्र हा दबाव झुगारून फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, अशा भूमिकेत आहे. सध्या या दोन्ही पक्षांत मुख्यमंत्रिपदावरून चर्चा चालू आहे. मात्र आज सकाळच्या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मकता दिसली नाही. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना उत्स्फूर्तपणे अभिवादन केलेले नाही. त्यामुळे आता मु्ख्यमंत्रिपदावरून या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा केला जातोय.
![City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 13 February 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a816eda91d530bae918d7812d0c1c535173946401707590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ Maharashtra Congress President , नाना पटोलेंना डच्चू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/e92a114d27798169b741f74761d5bd32173946384129990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 09 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/340a8dcae09df181a6035602fedbe1c2173946369976290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Speech : देर आए दुरुस्त आए... Rajan Salvi आज खऱ्या शिवसेनेत सामील झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a010a9e20fb1544ee1dc005f87190749173945290093090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 06 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/44a4262752b39affc68ac9fa00559bce173945200165590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)