एक्स्प्लोर
Religious Conversion Allegations | Beed Jail मध्ये कैद्यांवर धर्मपरिवर्तनाचा दबाव, अधीक्षक Gaikwad वर आरोप, चौकशीचे आदेश
बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप वकील राहुल आघाव यांनी केला आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. तीन हिंदू आणि एक मुस्लिम कैद्यावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अॅडव्होकेट आघाव यांनी सांगितले. अमोल सुगदेव भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण या तीन कैद्यांकडून लेखी तक्रारपत्र प्राप्त झाले आहे. त्यात म्हटले आहे की, 'जिल्हा कारागृह वर्ग दोन या ठिकाणी पेट्रस जोसेफ गायकवाड हे तुरुंग अधिकारी आहेत. त्यांच्याकडून त्यांना वारंवार धर्मपरिवर्तनासाठी प्रयत्न केला जातो. त्यांना मानसिक शारीरिक छळ केला जातो.' कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांनी या आरोपांची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची चौकशी होणार असून, वस्तुस्थिती तपासण्यासाठी पथक पाठवले जाईल. जेल अधीक्षक गायकवाड यांच्याकडूनही खुलासा घेतला जाणार आहे.
बीड
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























