एक्स्प्लोर
लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्याकडून माझाच्या बातमीची दखल; वाढत्या इंधन दराकडे लक्ष देण्याची मागणी
उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भात एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीची दखल लोकसभेत घेण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडलाय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या आयशा शेख यांना उज्ज्वला गॅस योजनेचा आठ कोटी क्रमांकाचा गॅस मिळाला होता. मोदींच्या हस्ते त्यांना हा गॅस देण्यात आला होता. पण आयशा शेख राहत असलेल्या घराचं भाडं 600रुपये तर गॅससाठी होणारा खर्च 800 रुपये होता. एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती. त्या बातमीचा संदर्भ खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दिला. वाढत्या इंधन दराकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी लोकसभेत केली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रीडा























