Amravati : अमरावतीतून रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला रवाना, वारीचं यंदा 429वं वर्ष ABP Majha
विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणीमातेचे माहेर अशा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूरला वारी आज दुपारी 3 वाजता प्रस्थान करणार आहे. यावेळी कोंडण्यपूर रुख्मिनी पिठचे जगतगुरु राजराजेश्वर माऊली सरकार, खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर ह्या उपस्थित राहतील.. आई रुक्मिणीमातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा कोरोनाकाळ वगळता 428 वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. वाशिष्ठा (वर्धा) नदीच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राहून संत सदाराम महाराजांनी 1594 साली वारीला प्रारंभ केला. वारीचे हे 429 वे वर्ष आहे. आई रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे.























