Amol Mitkari Akola : मिटकरींच्या बाप्पाच्या देखाव्याची चर्चा;मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर अजित पवार
Amol Mitkari Akola : मिटकरींच्या बाप्पाच्या देखाव्याची चर्चा;मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर अजित पवार
आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी केलेल्या आरोपांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे प्रत्युत्तर दिलं आहे. मी फुकलो तरी उदयराजे भोसले लोकसभा निवडणुकीत पडले असते, असं जरांगे म्हणाले होते, असा दावा राऊत यांनी केला होता. राजेंद्र राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पना राजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार आहेत. बार्शीतील राजेंद्र राऊतांचे विरोधक माजी आमदार दिलीप सोपल बरे आहेत. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत. मनोज जरांगे काय काय म्हणाले? मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराजांना, कल्पना राजे मासाहेबांना आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. राऊत कशाचाही शपथ घेतो, माझ्याजवळच त्यांनी पाच-पन्नास शपथ घेतल्या असतील. तुला देवेंद्र फडणवीसाचं सरकार निवडून यावं असं वाटतं तर आरक्षण का देत नाही? आम्हाला प्रश्न विचारणारा तू कोण? तुला वेळ आल्यावर कळेल देवेंद्र फडणवीसांचे ऐकून तू किती चिखलात फसला. बार्शी मराठ्यांचं घर तिथं घोंगडी बैठक होणार आहे. राजेंद्र राऊत आपला असून त्याच्यामध्ये फितुरीचे संस्कार आहेत. त्याच्यापेक्षा सोपल बरा म्हणावं लागेल. मराठ्यांच्या विचारांचे ओबीसी आहेत, ते चांगले आहेत. राजेंद्र राऊत मराठ्यांचे तुकडे करायला निघालाय, असं जरांगे म्हणाले आहेत.