Ahmednagar : शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी उपोषण
अहमदनगरच्या पारनेर तहसील कार्यालयासमोर भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने दुष्काळी भागाला पाणी मिळावे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे... भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर हे स्वतः आणि इतर पदाधिकारी उपोषण करत असून सात दिवस होऊन देखील प्रशासन या उपोषणाकडे लक्ष देत नसल्याने आंदोलन आणखी तीव्र करत आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.... कान्हूरपठार, पुणेवाडी, जातेगांव, राळेगणसिध्दी, शहाजापुर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वीन करावी... डिंबे माणिकडोह बोगद्याचे काम त्वरित सुरु करावे...तसेच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे ५० हजारांचे अनुदान ठराविक शेतकऱ्याऱ्यांना मिळाले आहे ते सर्व शेतकऱ्यांना मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे... आंदोलन स्थळावरून आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केले आहे आमच्या अहमदनगर प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी.