नागपूरमध्ये चिमुकल्याचं अपहरण, मदतीचा आव आणणारा शेजारीच आरोपी, चिमुकला बेपत्ता
नागपुरातील 9 वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण होऊन 12 दिवस उलटले, मात्र त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे त्याचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचा आव आणणारा शेजारीच त्याचा अपहरणकर्ता निघाला आहे.
आरोपी पकडला गेला, तरी 9 वर्षांचा सुजल वासनिक मात्र अद्यापही बेपत्ता आहे. स्वतःच्या बुडीत व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी रामदासनं सुजलचं अपहरण केलं. मुलाला सोडण्याच्या मोबदल्यात त्याने 10 लाखांची खंडणी मागितली.
पोलिस दाद देत नाहीत म्हटल्यावर कुटुंबियांनीच अपहरणकर्त्याला शोधून काढलं. मात्र सुजल वासनिक अजूनही घरी न परतल्यानं वासनिक कुटुंब चिंतेत आहे. अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतरही सुजलचा पत्ता लागलेला नाही.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
