एक्स्प्लोर
मुंबई | अभिनेत्यांनंतर 'मीटू'चं वादळ दिग्दर्शकांना धडकलं
बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमली पदार्थाचं सेवन करुन आपल्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी मला दारु प्यायला लावलं. त्यानंतर मला त्यांच्या कारमधून माझ्या घरी सोडतील असं वाटलं, पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेऊन अतिप्रसंग केल्याचं महिलेनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
आणखी पाहा























