एक्स्प्लोर
Gold Rate Hike : ऐन लग्नसराईत सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ, जाणून घ्या नवे दर
ऐन लग्नसराईत ग्राहकांना महागाईच्या झळा बसत असताना सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. प्रतितोळ्यामागे सोन्याचा भाव 242 रुपयांनी महागलाय. त्यामुळे एक तोळं सोनं आता 47 हजार 242 रुपयांवर गेलंय. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही किलोमागे 543 रुपयांची वाढ झालीय. सध्या एक किलो चांदीचा भाव आता 62 हजार 248 रुपये इतका झाला आहे.
आणखी पाहा























