VIDEO | सरकारने बंदी घातलेल्या JKLF चा इतिहास | एबीपी माझा
फुटीरतावादी नेता यासिन मलिकची संघटना जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमध्ये कठोर पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. यापूर्वी जमात ए इस्लामी या संघटनेवर भारत सरकारनं बंदी घातली होती. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला (JKLF)पाकिस्तानातून मदत मिळत होती आणि त्यांच्यामार्फत दहशतवाद्यांना पैसा पुरवला जात होता, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेनं दिली होती. या माहितीच्या आधारे जेकेएलएफवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. जेकेएलएफवर दहशतवादी प्रतिबंधक कायद्यानुसार बंदीची कारवाई करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहसचिव राजीव गाबा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दहशतवादविरोधी जीरो टॉलरन्सच्या नितीनुसार हे पाऊल उचललं असल्याचं त्यांनी सांगितलं.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
