Asha Bhosle Birthday : सूरांनी अवघ्या विश्वाला गवसणी घालणाऱ्या आशाताईंचा आज 90 वा वाढदिवस
सूर, ताल, लय यांचा संगम म्हणजे आशा भोसले. आपल्या सूरांनी अवघ्या विश्वाला गवसणी घालणाऱ्या आशाताईंचा आज ९० वा वाढदिवस आहे, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, इतक्या त्या आजही सक्रिय आहेत. त्यांच्या आवाजाने किमान चार पिढ्यावर मोहिनी घातलीय. भारतातील सर्व संगीतकार आणि बहुतेक सर्व गायकांसोबत आशाताईंनी काम केलंय. त्यामुळे त्या जशा जुन्या पिढीच्या तशाच आजच्या पिढीच्याही आहेत. त्यांना कोणतंही गाणं वर्ज नव्हतं. त्यामुळे बालगीतांपासून प्रेमगीतांपर्यंत, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत, सुगमसंगीतापासून अगदी कॅब्रेगाण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत सूरेल झालाय. अशा चिरतरूण आशाताईंना एबीपी माझाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा























