WB Election Results 2021 : झाशीच्या राणीप्रमाणे ममतादीदी लढल्या आणि विजयी झाल्या : छगन भुजबळ
नाशिक : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांची सत्ता येताना दिसत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या.. मै अपना बंगाल नही दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते. पण, उपयोग झाला नसल्याची टीका भुजबळ यांनी केलीय.
संपूर्ण शक्ती लावूनही आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही. भाजप विरोधात प्रचंड लाट देशात तयार झाली आहे. या काळात देशात निवडणूक झाली तर भाजप नावालाही सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिलीय. तर पंढरपूर पोट निवडणुकीचा निकाल गट तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे, त्यावरून देशाचा कल बांधता येत नाही, असेही ते म्हणाले.





















