एक्स्प्लोर

EPFO Interest : ईपीएफओ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2024-25 या वर्षाचं व्याज जमा, कोट्यवधी सदस्यांना फायदा

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2024-25 साठीचं व्याज खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या आठवड्यात ईपीएफओ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम वर्ग केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी 8.25 टक्के व्याज खातेदारांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. ही प्रक्रिया आठवड्यात पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. यामुळं देशातील 33.56 कोटी खात्यांमध्ये व्याज वर्ग केलं जाईल.

ईपीएफओकडून दरवर्षी खातेदारांच्या खात्यात व्याज वर्ग केलं जातं. केंद्र सरकारकडून ईपीएफओच्या खातेदारांना किती टक्के व्याज द्यायचं याबाबतच्या शिफारशीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज वर्ग केलं जातं.  

आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्र सरकारनं 8.25 टक्के दराला 22 मे 2025 ला मंजुरी दिली आहे. त्यानंतर 6 जूनपासून ईपीएएफओकडून  वार्षिक व्याज जमा करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या वर्षातील वार्षिक खाते अपडेशनची प्रक्रिया 13.88 लाख नियोक्त्यांसाठी आणि 33.56 कोटी सदस्य खात्यांची पूर्ण झाली आहे. ही आकडेवारी 8 जुलैपर्यंतची आहे. 13.86 लाख नियोक्त्यांकडील 32.39 कोटी खात्यांमध्ये 8 जुलैपर्यंत व्याज जमा करण्यात आलं आहे. ईपीएफओ नियोक्त्यांची वार्षिक खात्यांच्या अपडेशनची प्रक्रिया 99.9 टक्के आणि 96.51 सदस्य खात्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

मनसुख मांडवीय यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरु झाली होती. व्याज जमा करण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण झाली होती.यंत्रणेतील ऑप्टिमायझेशनमुळं या वर्षी व्याज जमा करण्यासंदर्भातील महत्त्वाची प्रक्रिया जूनमध्येच बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं मनसुख मांडवीय म्हणाले.  

मनसुख मांडवीय यांनी म्हटलं राहिलेल्या खात्यांमध्ये व्याज येत्या आठ दिवसांमध्ये जमा केलं जाणार आहे. आर्थिक वर्ष 2025 साठी व्याज 8.25 टक्क्यांनी जमा केलं जाईल. केंद्र सरकारनं ईपीएफओकडून करण्यात आलेल्या शिफारशीला मान्यता देत घेण्यात आला होता. ईपीएफओच्या केंद्रीय बोर्डाची 237 वी बैठक 28 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत पार पडली होती. त्या बैठकीचं अध्यक्षपद मनसुख मांडवीय यांनी भूषवलं होतं.त्यानंतर वित्त मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. 

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ईपीएफओनं  8.15 टक्के व्याज दिलं होतं. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ईपीएफओनं  8.15 टक्के व्याज दिलं होतं. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 0.10 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.  

ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 8.10 टक्के व्याज दिलं होतं. त्यापूर्वी 2021-22 मध्ये 8.5 टक्के व्याज दिलं गेलं होतं. तर,1977-78 मध्ये 8.1 टक्के व्याज देण्यात आलं होतं. 

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget