BJP : उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपला खिंडर, मंत्री - आमदारांचं राजीनामा नाट्य सुरूच
असं असलं तरी योगी मंत्रिमंडळातलं राजीनामे काही थांबत नाहीत. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधून आणखी एका मंत्र्यानं राजीनामा दिला आहे. वन आणि पर्यावरण मंत्री दारा सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे बुधवारी आपला राजीनामा सोपवला. दलित, शेतकरी आणि बेरोजगारांची उपेक्षा होत असल्यामुळं आपण नाराज असल्याचं त्यांनी राजीनाम्यात म्हटलंय. योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनीही दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. मौर्य यांच्यापाठोपाठ दारासिंह चौहानही सपात जाणार असल्याचं म्हटलं जातंय. याशिवाय योगी सरकारमधील आणखी एक मंत्री धर्मसिंह सैनीही राजीनामा देणार असल्याचं बोललं जातंय. तिकडे गोव्यातही भाजपला धक्का बसलाय. भाजपचे आमदार आणि मंत्री मायकल लोबो यांच्यानंतर आमदार प्रवीण झांट्ये यांनीही राजीनामा दिलाय. याआधी भाजपाच्या कार्लोस अल्मेडा आणि एलिना साल्डान्हा यांनी राजीनामे दिले आहेत.