Ahmednagar मध्ये 61 गावात आजपासून 13 तारखेपर्यंत Lockdown ,आजपासून शाळा सुरू होणार नाहीत
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत नसून जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर व राहाता तालुका हॉटस्पॉट ठरत असून कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून राज्यातील तिसरी लाट अहमदनगर जिल्ह्यातून सुरू होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाल आहे. काल संगमनेर तालुक्यातील कोरोना आढावा वैठकीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कडक उपाय योजना करण्याचे आदेश दिले असून बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भोसले यांनी कोरोना आटोक्यात आला नाही तर संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय राहील असा इशारा जिल्हावासियांना दिलाय.
जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर व राहाता तालुक्यातील 117 गावं कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून या गावातील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले असून जिल्ह्यातील होम आयसोलेशन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले या सर्व उपाय योजना करूनही कोरोना आटोक्यात न आल्यास संपूर्ण लॉकडाऊन हाच एकमेव उपाय असेल असा इशारा सुद्धा जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिलाय.