एक्स्प्लोर
CBSE : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत मोठा निर्णय
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याची महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बेठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्य व इतर तज्ज्ञांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुलांची सुरक्षा आणि आरोग्य ही प्राथमिकता आहे. अशा वातावरणात मुलांना ताण देणे योग्य नाही. मुलांचे जीवन धोक्यात घालू शकत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
आणखी पाहा


















