एक्स्प्लोर
Shoot out : बारामतीच्या माळेगावात जिल्हा परिषद सदस्याच्या पतीवर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची माहिती
जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे सायंकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे. तावरे हे त्यांची पत्नी समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते.. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले.
आणखी पाहा























