Mumbai Cruise Drugs Case : Aryan Khan वर ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप ABP Majha
मुंबई : मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छाप्यानंतर ताब्यात घेतलेल्या आठपैकी तीन जणांना एजन्सीने अटक केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या तीन आरोपींना जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे.
आरोपींना सायंकाळी 7 वाजता न्यायालयात हजर केले जाईल. मुंबईच्या फोर्ट कोर्टात हजर केले जाणार आहे. तीन शक्यता सांगितल्या जात आहे. यात आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जाऊ शकते. किंवा त्यांना न्यायालयात नेले जाऊ शकते जेथे न्यायाधीश विशेषतः या प्रकरणात सुनावणीसाठी येतील. किंवा मग ते दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्यावरही नेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या


















