एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंडरवर्ल्डमधील साडेसात कोटींचं 'लव्हलेटर'
अंडरवर्ल्डमध्ये कुठलीही कारवाई करताना कोडवर्ड वापरण्याची पद्धत आहे. अशाच एका कोडवर्डच्या माध्यामातून एकाला साडेसात कोटींचे नुकसान झाले आहे.
मुंबई : अंडरवर्ल्डमध्ये माफिया डॉन त्यांच्या रोजच्या व्यवसायात कोडवर्ड वापरत असतात. सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी हे कोडवर्ड वापरले जातात. जगभरात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात हे कोडवर्ड खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. अशाच प्रकारची एक घटना मुंबईत समोर आली आहे. अंडरवर्ल्डमध्ये खंडणी मागण्यासाठी आणि एखादा कोडवर्ड वापरण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला जातो. अशाच एका प्रकरणात आपल्या परिचितांना पैसे देण्याकरिता किंवा त्या विकासकाच्या प्रोजेक्टमध्ये कमी किमतीत घर देण्यासाठी "लव्हलेटर" हा शब्द खंडणीखोर एजाज लकडावाला वापरायचा.
अंडरवर्ल्ड काँग्रेसला फायनान्स करत होतं? देवेंद्र फडणवसींचा सवाल
एजाज लकडावाला, सलीम महाराज आणि तारीख परवीन यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. जिथे या तिघांवर एका नवीन प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलाय. दोन दिवसापूर्वी पायधुनी पोलीस स्टेशनमध्ये एका विकासकाने गुन्हा दाखल केला आहे. ज्यात या तिघांमुळे सदर विकासकाला साडेसात कोटींच नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय. एजाज लकडावाला हा पैसे खंडणीच्या स्वरूपात न मागता आपल्या ओळखीच्या लोकांना स्वस्तात घर किंवा एखाद्याच्या सेटलमेंट करण्याकरीता किती पैसे द्यायचे ही रक्कम ठरवायचा. ज्यामुळे त्या विकासकाला साडेसात कोटींचे नुकसान झाले. या प्रकरणात विकासकाला धमकवण्यासाठी लवलेटर या शब्दाचा प्रयोग केला जात असे.
अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक
तुझे लव लेटर नही आया लगता है -
सलीम महाराज हा विकासकाच्या ओळखीचा होता आणि त्याची सर्व माहिती तो तारीख परवीनला द्यायचा. त्यानंतर ही माहिती एजाज लकडावालापर्यंत पोचवायचं काम तारीख परवीन करायचा. विकासकाला जेव्हा तारिक परवीन भेटत असे तेव्हा त्याला विचारायचं की "तुझे लव लेटर नही आया लगता है" म्हणजेच एजाज लकडावालाचा फोन त्याला अजून आला नाही वाटतं. अशाप्रकारे त्या विकासकाला लकडावालाच्या त्या लवलेटरमुळे साडेसात कोटींचं नुकसान सहन करावा लागलं. एजाज लकडावाला याच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या त्या दिवसापासून या तपासामध्ये नवीन-नवीन धागेदोरे सापडत आहेत. या प्रकरणांमध्ये आणखी किती मासे गळाला लागतील हे पाहणे आता महत्वाचे आहेत.
WEB EXCLUSIVE | करीम लाला, हाजी मस्तान ते दाऊद... | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement