एक्स्प्लोर

अंडरवर्ल्ड काँग्रेसला फायनान्स करत होतं? देवेंद्र फडणवसींचा सवाल

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाला भेटत होत्या का? अशा भेटी होत होत्या तर मग काँग्रेस पक्षाला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

मुंबई : इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाला भेटत होत्या का? अशा भेटी होत होत्या तर मग काँग्रेस पक्षाला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. फडणवीस यांनी मागणी केली आहे की, काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.

काल (15 जानेवारी) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला होता की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईतल्या पायधुनी परिसरात अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी येत होत्या. राऊतांच्या या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, इंदिरा गांधी मुंबईत करीम लालाला भेटण्यासाठी येत होत्या, यावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्याला आणि देशाला सांगावं की, इंदिरा गांधी खरंच करीम लालाला भेटण्यासाठी येत होत्या का? अशा भेटी होत होत्या तर काँग्रेस पार्टी त्या काळात अंडरवर्ल्डच्या भरवशावर निवडणुका जिंकत होती का? काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरं तातडीने द्यावीत, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले की, छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम हे महाराष्ट्र सरकार चालवत होतं का? 1960-70 च्या दशकांमध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती अंडरवर्ल्डकडून होत होती का? अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान किंवा इतर डॉन मंत्रालयात यायचे तेव्हा त्यांना सेलिब्रेटिसारखं वागवलं जात होतं का? या सर्व प्रश्नांवर काँग्रेसने खुलासा करावा.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना विचारु इच्छितो की, ज्या शिवसेनेसोबत ते महाराष्ट्रात सत्तेत बसले आहेत, त्या शिवसेनेच्या नेत्यांनी कांग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर असे आरोप केल्यानंतरही काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत का बसली आहे?

करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांची पत्रकार परिषद | ABP Majha

पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra IPS Promotion DGP : मुंबई अन् ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना मोठं प्रमोशन! देवेन भारती, आशुतोष डुंबरे आता थेट 'DGP'!
मुंबई अन् ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना मोठं प्रमोशन! देवेन भारती, आशुतोष डुंबरे आता थेट 'DGP'
Ravindra Chavan On Rahul Gandhi : 'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा!' राहुल गांधींच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर; दाखवला '2014 पूर्वीचा आणि नंतरचा' फरक
'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा!' राहुल गांधींच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांचे सणसणीत प्रत्युत्तर; दाखवला '2014 पूर्वीचा आणि नंतरचा' फरक
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget