![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक
जून 2019 मध्ये सेनेगल कोर्टाने रवि पुजारीची जामिनावर सुटका केली होती. ज्यानंतर रवि पुजारी पसार झाला होता. भारतीय गुप्तचर यंत्रणा रवि पुजारी वर लक्ष ठेवून होते. भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या माहितीच्या सहाय्याने सेनेगल पोलिसांनी रवि पुजारीला अटक केली होती.
![अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक Underworld don ravi pujari to be extradited to india today अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिकेच्या सेनेगलमधून अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/23164125/ravi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. तिथून त्याला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. पुजारीला रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त पथकानं पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक केली. भारतात आणल्यानंतर पुजारी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहिल. रवि पुजारी सेनेगलमध्ये एँटोनी फर्नांडिस नावाने पासपोर्ट बनवून राहत होता. अखेरच्या वेळी पुजारी सेनेगलमधूनच फरार झाला होता.
जून 2019 मध्ये सेनेगल मधून झाला होता फरार
जून 2019 मध्ये सेनेगल कोर्टाने रवि पुजारीची जामिनावर सुटका केली होती. ज्यानंतर रवि पुजारी पसार झाला होता. भारतीय गुप्तचर यंत्रणा रवि पुजारीवर लक्ष ठेवून होते. भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या माहितीच्या सहाय्याने सेनेगल पोलिसांनी रवि पुजारीला अटक केली होती. शनिवारी कर्नाटक पोलीस, रॉ, सेनेगल पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये रवि पुजारीला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
रवि पुजारीची प्रत्यार्पणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, त्याला कुठल्याही क्षणी भारतात आणलं जाऊ शकतं. रॉ आणि कर्नाटक पोलीस अजूनही सेनेगल मध्येच असून रवि पुजारील भारतात आण्याच्या प्रयत्नात आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात रवि पुजारी विरुद्ध 98 गुन्हे दाखल आहेत
रवि पुजारी अंडरवर्ल्डमधील एक चर्चित नाव असून कर्नाटक आणि महाराष्ट्रमध्ये रवि पुजारी वर एकूण 98 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बहुतेक गुन्हे खंडणीसाठी खंडणी संदर्भात दाखल आहेत. रवि पुजारीने अनेक बॉलीवूडशी संबंधित लोकांना आणि बड्या व्यासायिकांना खंडणीसाठी धमकावले होते. गेल्या वर्षी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यालासुद्धा रवि पुजारीकडून खंडणीसाठी फोन आल्याची तक्रार जिग्नेश मेवाणीने केली होती.
कोण आहे रवि पुजारी?
- 52 वर्ष रवी पुजारीचा जन्म कर्नाटकच्या मंगळुरू मध्ये झाला होता.
- रवी पुजारी ला हिंदी इंग्रजी आणि कन्नड भाषेचा ज्ञान होतं.
- अभ्यासात हुशार नसल्यामुळे वर्गात वारंवार नापास होत असे आणि म्हणून त्याला शाळेतून काढण्यात आलं होतं.
- रवी पुजारीला पत्नी, दोन मुली,एक मुलगा आहे, तर रवी पुजारी च्या 28 वर्षीय मुलाकहे नुकतेच ऑस्ट्रेलियामध्ये लग्न झाले.
- 1990 पुजारी अंधेरीत राहत होता. तिथे तो छोटा राजन च्या संपर्कात आला आणि लौकरच विजय शेट्टी आणि संतोष शेट्टी सोबत छोटा राजन च्या गँग मध्ये सामील झाला.
- 1995 चेंबूर मध्ये बिल्डर प्रकाश कुकरेजा च्या हत्येनंतर ही गेंग चर्चेत आली.
- 2000 बँकॉक मध्ये छोटा राजन वर दाऊद कडून करण्यात आलेल्या हल्ल्या नंतर रवी पुजारी ने स्वतःची गँग बनवली आणि दुबई मधूनच खंडणीच उकळण्याचं काम करू लागला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)