Zero Hour Weather Change Effects : मार्चच्या सुरुवातीलाच पारा 35 अंशांवर, दुष्परिणाम काय?
Zero Hour Weather Change Effects : मार्चच्या सुरुवातीलाच पारा 35 अंशांवर, दुष्परिणाम काय?
नाशिकमध्ये तर रात्री गारठा आणि दिवसा चटके बसणार ऊन पडत. त्यामुळे नागरिकांमध्ये साथीचे आजार वाढताना दिसतात. तसच अनेकांना उन्हाचा त्रासही होतोय. पाहूयात महापालिकेचे महामुद्दे मधला नाशिक वरचा स्पेशल रिपोर्ट. मंडळी, महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये सध्या विचित्र हवामान झालय, रात्री गारवा आणि दिवसा उकाडा. आता नाशिकचाच बघा, नाशिकमध्ये रात्रीच तापमान 17 अंशांच्या आसपास असतं तर दिवसा ते दुप्पट होतं कारण दुपारी पारा, 34 ते 35 अंशांवर जातो. यामुळे अंगाची लाही लाही तर होतेच, मात्र साथीचे आजारही वाढत. याची दखल सरकारी यंत्रणेने देखील घेतली. नाशिक जिल्हा रुग्णालय प्रशासनान 10 बेड राखीव ठेवत उष्माघाती संबंध कक्षाची उभारणी सुरू केली. हात वारंवार धुवावे, बाहेर खाणं टाळावं आणि पाणी उकळलेलं प्यावं. बऱ्याचदा हे सगळे जे व्हायरल आणि हे सगळं इन्फेक्शन आणि हे होत हे सगळं कॉमन पाणी जे आपण इन्फेक्टेड पितो त्याच्यामुळे आणि बाहेर जे अनहायजेनिक खातो त्याच्यामुळे तो स्प्रेड होतो. तर लोकांनी खायची आणि पाणी प्यायची ही काळजी घेतली आणि हात वारंवार धुतले आणि गर्दीचे ठिकाण टाळलं तर बऱ्यापैकी फरक पडेल. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात फक्त नाशिकच नाही तर अनेक शहरांमध्ये पारा प्रचंड वाढला. वाशिम 37.6 अंश सेल्सियस, चंद्रपूर 36.2 अंश सेल्सियस, पुण्याचा पारा 35.2 अंश सेल्सियस वर गेला तर संभाजीनगर मध्ये देखील तापमान 35. अंशांवर गेलं, नागपूर आणि मुंबईत देखील पारा 34 अंशांच्या पार जातोय. इतक्या तीव्र उन्हामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. तोल जाणं किंवा चक्कर येणं, सतत डोक दुखणं, शरीरातील पाण्याच प्रमाण कमी होणं, शरीरावर चट्टे उमटणं, दम लागणं, हृदयाचे ठोके वाढणं, हिट स्ट्रोक असे काही. प्रकार घडू शकतात. अशा तीव्र उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. भरपूर पाणी पित रहा. वेळेत जेवण करा. उन्हात चालणं टाळा. डोक्यावर टोपी किंवा दुपट्टा हवा. बरं वाटत नसल्यास डॉक्टरांकडे जा. पैशाकडे पाहून टाळू नका. नाशिक मधल्या गर्मीवर तिथल्या नागरिकांच काय म्हणण तेही पाहूया. लाच ही अवस्था आहे तर मे महिन्यात काय होईल या विचारानच धडकी भरतीय. 20 वर्षांपूर्वी अशक्य वाटणार तापमान आज नेहमीच होत चाललय. याला माणसाची हावत जबाबदार आहे आणि म्हणूनच त्यावर उपाय देखील आपल्यालाच काढावा लागणार आहे.
All Shows

































