Zero Hour : स्वप्नील कुसळेच्या स्वागत रॅलीत पोलीस अधीक्षकांकडून ABP माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की
Zero Hour : स्वप्नील कुसळेच्या स्वागत रॅलीत पोलीस अधीक्षकांकडून ABP माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की
पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करुन कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे आज कोल्हापुरात दाखल झालं.. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वप्नीलचं जंगी स्वागत करण्यात आलं... पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कोल्हापुरातील महत्वाच्या व्यक्ती स्वागतासाठी उपस्थित होत्या.. कोल्हापूरच्या ताराराणी चौकामधून या जंगी स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली..दसरा चौकापर्यंत तीन ठिकाणी स्वप्निल वर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली..त्यानंतर दसरा चौकात भव्य सत्कार समारंभ पार पडला.. नाही म्हणायला या नितांत सुंदर सोहळ्याला पोलिसांच्या अरेरावीनं गालबोट लागलं.. रॅली कव्हर करणाऱ्या एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांंना पोलीस अधीक्षकांकडूनच धक्काबुक्की करण्यात आली.. माजी गृहमंत्री सतेज पाटील यांनी या धक्कादायक प्रकाराकडे लक्ष वेधत संताप व्यक्त केला.. खासदार धनंजय महाडिकांनीही हा प्रकार गृहमंत्री फडणवीसांच्या कानावर घालणार असल्याची ग्वाही दिली.