Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
Share Market : भारतीय शेअर बाजारात 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान मंदी पाहायला मिळाली. यामुळं सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचं नुकसान झालं.

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान तेजी आणि घसरणीचं सत्र सुरु होतं. शेअर बाजारातील घडामोडींचा मोठ्या कंपन्यांच्या बाजारमूल्यावर झाल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील घसरण झाली. सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांचं बाजारमूल्य 1 लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे. म्हणजेच या कंपन्यांचे शेअर ज्या गुंतवणूकदारांकडे आहेत, त्यांचं 1 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला बसला.
10 ते 14 ऑगस्ट दरम्यान सेन्सेक्स 489.92 अंकांनी घसरुन बंद झाला. दुसरीकडे एनएसईवर निफ्टीमध्ये देखील 204.65 अंकांची घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि टीसीएसच्या बाजारमूल्यामध्ये घसरण झाली.
टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. यामध्ये सर्वाधिक फटका टीसीएसला बसला. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचं बाजारमूल्य 34263.28 कोटी रुपयांनी कमी होत 853506.85 कोटींवर आलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 31869.13 कोटी रुपयांनी कमी होत 1770056.06 कोटी रुपयांवर आलं आहे. तर, स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 25891.88 कोटींनी कमी होत 985829.96 कोटी रुपयांवर आलं आहे.
एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 7165.37 कोटी रुपयांनी कमी होत 1120802.10 कोटींवर आलं आहे. आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 2792.65 कोटी रुपयांनी कमी होत 1017577.98 कोटी रुपयांवर आलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज बाजारमूल्याचा विचार करता देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्यानंतर भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि टीसीएस असा क्रम आहे.
शेअर बाजारात पाच दिवसात भारती एअरटेल, बजाज फायनान्स, एल अँड टी, भारतीय जीवन विमा निगम, हिंदूस्तान यूनिलीवरचे बाजारमूल्य 55149.45 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सर्वाधिक बाजारमूल्य एलआयसीचं वाढलं आहे. एलआयसीचं मार्केट कॅप 26438.49 कोटी रुपयांनी वाढून 523330.31 कोटी रुपये झालं आहे.
भारती एअरटेलचं बाजारमूल्य 20592.13 कोटी रुपयांनी वाढून 1243016.11 कोटी रुपये झालं आहे. तर, बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 3548.79 कोटी रुपयांनी वाढून 677197.34 कोटी रुपये झालं आहे.
एल अँड टी कंपनीचं बाजारमूल्य 2490.66 कोटी रुपयांनी 558973.11 कोटी रुपये झालं आहे. हिंदुस्तान युनिलीवरचं बाजारमूल्य 2079.38 कोटी रुपयांनी वाढून 490888.35 कोटी रुपये झालं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
महत्त्वाच्या बातम्या






















