Zero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?
Zero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?
आजचा दिवस गाजवला तो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी. आणि त्यानंतर राज्यातल्या बंडखोर नेत्यांनी.
महाराष्ट्रात सगळ्या पक्षांकडून उमेदवार फायनल करण्यात आले. तसंच आज बंडखोरीही निश्चित झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सगळ्याच आघाड्यांच्या प्रमुखांनी शेवटच्या दिवसापर्यंत बंडखोरांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले.. काही ठिकाणी त्यांना यश आलं.. पण, काही ठिकाणी बंडखोर आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले...
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली.. त्यामुळं आजही महाविकास आघाडी असो महायुती, दोन्ही आघाड्यांच्या सगळ्या प्रमुखांची चांगलीच दमछाक झाली.. कोणकोणत्या बंडखोरांनी आज अर्ज मागे घेतले.. आणि कोणी आपली उमेदवारी कायम ठेवत पक्षालाच आव्हान दिलं.. हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत..
पण, सुरुवातीला मराठा आरक्षण आंदोलकाचे पोस्टर बॉय मनोज जरांगे पाटलांची एक घोषणा...
मंडळी, मनोज जरांगे पाटलांनी काही मतदारसंघांत उमेदवार देण्याची काल संध्याकाळी घोषणा केली होती. त्यांनी काही नावं जाहीर केली. म्हणजेच मराठा समाजातल्या ज्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते.. ते त्यांच्याच पाठिंब्यानं उभे असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर काही मतदारसंघांत आपण पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाच्या वेगवेगळ्या भागातील प्रतिनिधींशी चर्चा करायला सुरुवात केली..
वाटलं होतं.. आज सकाळी मजोन पाटील आपल्या आणखी काही उमेदवारांची नावं जाहीर करतील. पण, जरांगे पाटलांनी वेगळीच घोषणा केली.. ज्यानं राज्यात अनेकांना धक्का बसला