Zero Hour : मोदींना एकमतानं पाठिंबा जाहीर ते दिल्लीत फडणवीसांच्या गाठीभेटी
Zero Hour : मोदींना एकमतानं पाठिंबा जाहीर ते दिल्लीत फडणवीसांच्या गाठीभेटी आज दिल्लीतील संविधान हॉल... एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला.. कारण, संविधान हॉलमध्ये एनडीएनं एकमतानं नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा नेता म्हणून निवडलंय.. आणि मोदींच्या तिसऱ्या टर्मला एकमतानं पाठिंबा जाहीर केलाय.. याचबरोबर आज आपण अनेक महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत... देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा.. आणि भेटीगाठी.. लोकसभेच्या निकालानंतर सरकारमधून मुक्त करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचलेत.. तेही व्हाया नागपूर ... काल संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर फडणवीस रात्री उशीरा दिल्लीत पोहोचले.. आज सकाळी एनडीएच्या बैठकीत पोहोचले.. त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस थेट अजित पवारांच्या भेटीला पोहोचले.. सरकारमधून दूर होण्याची मागणी दिल्लीत मान्य होईल का? हे हि आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत...