Zero Hour MVA : मविआत एकमेकांवरच तलवारी?पालिकेआधीच मविआ फुटणार? Sushma Andhare EXCLUSIVE
नमस्कार मी सरिता कौशिक.. झीरो अवरच्या विकेंड स्पेशलमध्ये आपलं स्वागत...
जिथं देशातल्या सरकार विरोधकांची असलेली इंडि आघाडी अनेक पातळ्यावर तुटल्यात जमा झालीय... तिथं राज्य पातळीवरही तडे जातायेत.. एकत्र लढलो तर सत्तेचं अमृत चाखता येईल... याच अजेंडावर एकत्र आलेले विरोधक ... म्हणजेच महाविकास आघाडी ... आज मात्र.. विखुरताना दिसतेय ...
२०१९ साली महाराष्ट्रात हि महाविकास आघाडी तयार झाली होती. त्यानंतरची २०२४हि पहिली विधानसभा निवडणूक. पण महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आणि नंतर पहिल्या दिवसांपासूनच खटके उडू लागले.. तरीही पहिल्या फळीतील नेत्यांनी मात्र, एकजूट दाखवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरुच ठेवले होते..
आता ... आज .... त्यालाही तडा गेलाय ... काँग्रेस उद्धव सेना आणि आपल्याच काही नेत्यांवर नाराज आहे ... तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हि काँग्रेस आणि उद्धव सेनेवर नाराज आहे ... तर उद्धव सेने काँग्रेसवर नाराज आहे ...
एकूणच काय ना मंडळी.. जिथं हम साथ साथ है... अशी सुरुवात झाली होती... तिथंच आज... हम आप के है कोन? अशी गत होताना दिसतेय.. पण, हे होत असतानाच एकमेकांवर जोरदार नाराजी.. जोरदार चिखलफेक सुुरु झालीय.. मविआतील याच संघर्षावर आहे आपला आजचा प्रश्न.. आणि तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला...