Zero Hour : मराठा आरक्षण विधेयक मंजूर तरी मनोज जरांगेंची नाराजी... झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
नमस्कार मी, सरिता कौशिक, झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. आजचा दिवस तमाम मराठा समाजासाठी अत्यंत महत्वाचा ठरलाय. कारण, आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणासाठीचं विधेयक एकमतानं मंजूर झालंय.. आणि त्याबरोबरच महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के स्वतंत्र असं आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मात्र, दुसरीकड़े याच मराठा आरक्षण विधेयकावरुन विरोधही सुरु झालाय.
सगळ्यात महत्वाचा विरोध म्हणजे - मनोज जरांगेचा .... ह्या खेपेचा मराठा आरक्षणाचा खटाटोपच मुळात ज्या मनोज जरांगेममुळे परत एकदा सुरु झाला, ज्यांना एकानंतर एक आश्वासन देत मुख्यमंत्री आणि सरकारने पुढचे पाऊल टाकले, इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा मोठ्ठा exercise केला.. ते जरांगे खुश होणं तर दूर, प्रचंड नाराज झाल्याचा चित्र उभं झालंय ... अगदी थोड्या वेळात मनोज जरांगे झीरो अवर मध्ये सहभागी होणार आहेतच ...
आज सकाळी मनोज जरांगे यांना दिलेला शब्द पाळत सरकारने विशेष अधिवेशन बोलावले. आधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या अहवालाला एकमतानं मंजुरी मिळाली.. आणि मग, हाच अहवाल विधिमंडळासमोर ठेवला गेला.. मुख्यमंत्र्यांनी भाषणंही केलं ... आणि त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मराठा आरक्षण विधेयक २०२४ एकमतानं मंजूर झालं..
आणि २० फेब्रुवारी २०२४ ला मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के स्वतंत्र मिळालं ...
दोन प्रश्न सर्वांच्याच मनात होते...
आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवर जाईल का? आणि तसं झालं तर ते कोर्टासमोर टिकेल का? याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलंय .. पाहुयात..
सगळे कार्यक्रम
![Zero Hour : Bhiwandi Corporation : महापालिकेचे महामुद्दे : भिवंडीतील कामवारी नदी मृत्यूशय्येवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/ed244796d787a4777c34b3d0e97394b217395537810871000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/c48bb4a05c4b8270d492f411635a3a0117395537571591000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/cea4ed15e08067ab33377cdc770a2ff217395536829411000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a0c0536298d4a5535ed194b42671c573173947121015190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/2ccd28aa0d105b8711a3264b0b251010173946975247990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)