Zero Hour Marathwada Drought :घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळणार?
Marathwada Water Crisis : राज्यात नुकत्याच पाचही टप्प्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. असे असतानाच दुसरीकडे राज्यातील बहुतांश भागासह मराठवाडा दुहेरी संकटात सापडल्याचे भयाण चित्र आहे. एकीकडे पाणी टंचाई (Water Crisis) पाहायला मिळत असून, दुसरीकडे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकरी अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे. त्यात मराठवाड्यातली (Marathwada) काही उदाहरण दुष्काळ आणि अवकाळीची दाहकता सांगायला पुरेशी आहेत.
एका दृश्यांमध्ये धडपड सुरू आहे ती घोटभर पाण्यासाठी, जनावरांचा जीव वाचवण्यासाठी, तर हंडाभर पाण्यासाठी मैलोंची पायपीट करून कोरड्या घशाची तहान भागवणासाठीची. दुसरे चित्र आहेत त्याच मराठवाड्यातील अस्मानी संकटाची. संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली पपईबाग वादळी वाऱ्याने भुईसपाट झाली आहे. तर इतर शेतकऱ्यांच्या शेतपिकांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे अवकाळी आणि दुष्काळाच्या दृष्टचक्रात मराठवाडा अडकल्याचे चित्र आहे.