Beed Crime: महादेव मुंडेंच्या खूनात वाल्मिक कराडचा हात? बाळा बांगरची पोलिसांकडून तब्बल 6 तास चौकशी, जबाबही नोंदवला
संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनामध्ये अडकवणार अशी वाल्मिकने फोनवरून मला धमकी दिली होती ,असा दावा बांगर यांनी केला होता.

Beed: बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा 18 महिन्यापूर्वी धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला होता. यात अद्याप एकही आरोपीला अटक झालेली नाही. परंतु आता सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे बाळा विजयसिंह बांगर यांचा जबाब काल केज येथे पोलिसांनी नोंदवला असून त्या दिशेने तपास देखील सुरू केला आहे. (Mahadev Munde)
बाळा बांगरांची 6 तास चौकशी, जबाब नोंदवला
दोन दिवसांपूर्वी विजयसिंह बाळा बांगर यांनी पाटोदा येथे पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. एवढेच नाही तर महादेव मुंडे यांचं कातडं, हाड आणि रक्त आणून वाल्मिक कराडच्या समोर टेबलवर ठेवल्याचा देखील खळबळजनक दावा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. . संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच तुला एका सरपंचाच्या खुनामध्ये अडकवणार अशी वाल्मिकने फोनवरून मला धमकी दिली होती ,असा दावा बांगर यांनी केला होता.
त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवावा अशी मागणी केली होती. या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनीही तातडीने सूत्रे हलवत तब्बल 6 तास चौकशी करत बाळा बांगर यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
ज्ञानेश्वरी मुंडेंनी काय केली होती मागणी?
परळीतील मृत व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी कारण त्यांना आरोपी माहीत आहेत आणि त्यांची फिर्याद देखील घ्यावी.अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे त्याचबरोबर एसपी साहेबांना देखील आरोपी निष्पन्न झाले आहेत,पण ते आरोपीची पाठराखण का करत आहेत? तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांचे देखील चौकशी करावी. अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ानेश्वरी मुंडे यांनी केली होती.
हेही वाचा
























