Zero Hour : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पारा चढला
Zero Hour : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पारा चढला राज्यात जसजसा उन्हाचा पारा वाढतोय.. तसतसा राजकीय पाराही वाढतोय.. अर्थात त्याला कारण आहे.. लोकसभा निवडणुका आणि.. ढीग भर पक्ष, त्यांचं उमेदवार आणि शेकडो इच्छुक.. त्यातच महाविकास आघाडीसाठी पश्चिम विदर्भाच्या अकोल्यातून एक अत्यंत महत्वाची बातमी पुढे आली तर दुसरीकडे पूर्व विदर्भात तर राजकीय तापमान आज चांगलंच वाढलं होतं ... पहिल्या टप्प्यात इथे निवडणूक होणार आहेत आणि आज नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, आदित्य ठाकरेंसह सर्वपक्षीय नेत्यांचं शक्तिप्रदर्शन इथे झाले ... हे सगळं सविस्तरपणे आपण पाहणार आहोत..
मात्र, सुरुवातीला.. बातमी दोन संजयांची..दोन्ही प्रवक्ते ... नुसते प्रवक्तेच नाहीत तर मुख्य प्रवक्ते ...
एक उद्धव ठाकरेंचे तर दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे .... होय ... मी बोलतेय संजय राऊत आणि संजय शिरसाट बद्दल ... खरंतर, जेव्हा शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात बंड केलं, तेव्हापासून संजय राऊत.. हेच शिंदेंच्या संपूर्ण टीमच्या निशाण्यावर होते.. आज जवळपास दोन वर्षांनंतरही.. ऐन लोकसभेच्या तोंडावर.. पुन्हा एकदा हेच संजय राऊत.. शिंदेंच्या निशाण्यावर आलेत.
उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द संजय राऊतांनीच संपवली .... असा आरोप संजय शिरसाठांनी कधीकाळी केला होता. आज त्यापुढे जात आणखी एक आरोप केलाय