Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांनी बांधलेला काशीतील मणिकर्णिका घाट (Manikarnika Ghat) बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आला आहे. हे पाडकाम करताना अहिल्याबाईंचा पुतळा तोडला गेल्याचा आरोप झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. यावरून पाडकामावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मोदी हे गझनी आहेत, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांनी वारासणीत बांधलेल्या घाटावर मोदी बुलडोझर चालवतात. मोदी हे गझनी आहेत, मनिकर्णिका घाट पाडत आहे, त्यांचा निषेध करतो. देवतांच्या मूर्ती पाडल्या गेल्यात. गझनीने जशी घाटावरील मंदिरे पाडली, तशीच मोदी पाडत आहेत, अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलीय. तर, काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल. वेळ पडली तर आम्ही देखील काशी येथे जाऊन आत्मक्लेश आंदोलन पुकारू, असा इशारा देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय.























