Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी शाळांना मंगळवारी (दि. २०) सुटी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’च्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१९) पुणे शहरातील प्रमुख भागांतील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. तर मंगळवारी (दि.२०) रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी शाळांना मंगळवारी (दि. २०) सुटी जाहीर करण्यात आली आहे.(Pimpri Chinchwad)
पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६ युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी शाळांना मंगळवारी (दि. २०) सुटी जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा २० जानेवारीला टीसीएस सर्कल हिंजवडी फेज-३ येथून सुरू होणार असून तो पुढे मेगापोलीस सर्कल सिंफनी सोसायटी समोरून उजवीकडे वळून- बापूजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जाऊन परत डोणे फाटा येथून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करेल. पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) – डावीकडे वळून आढले बुद्रूक-बेबड ओहळ,- चांदखेड-कासारसाई-नेरे-मारुंजी-लक्ष्मी चौक-भूमकर चौक भुयारी मार्ग-डांगे चौक भुयारी मार्ग- आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरून रिव्हर व्ह्यू चौक वाल्हेकरवाडी-टी जंक्शन डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेत उजवीकडे वळून डॉ. डी. वाय.पाटील कॉलेज आकुर्डी येथे समाप्त होणार आहे.
वाहतूक सूचना | २० जानेवारी २०२६ | मंगळवार
— पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police (@PCcityPolice) January 19, 2026
To facilitate smooth movement and minimise public inconvenience during the Pune Grand Tour Cycling Event, we have mapped the race route, restricted stretches, and diversion points for easy reference for race areas under our jurisdiction.… pic.twitter.com/0juhjkKrb3

























