एक्स्प्लोर

मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 

BMC Election 2026 Mayor election : महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी सध्याच्या घडीला ठाकरेंकडे दोन हुकूमाचे एक्के असल्याचं चित्र आहे.

BMC Mayor Election 2026 मुंबई :  मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 जाहीर झाल्यानंतर (Mumbai Municipal corporation result 2026) आता महापौर कोण होणार याची उत्सुकता आहे. मुंबई मनपाच्या निकालात 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील एकनाथ शिंदेंची शिवसेना 29 जागांसह तिसऱ्या स्थानावर गेली आहे. निकालानंतरएकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. महापौरांच्या निवडणुकीआधी फोडाफोडी होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व नेते आपआपल्या पक्षातील नगरसेवकांना सांभाळण्यात गुंतले आहेत.  

अशावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर "देवाची इच्छा असेल तर महापौर आपला असेल" असं वक्तव्य केलं होतं. एकीकडे ठाकरेंचं वक्तव्य, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने, राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, देवाच्या मनात म्हणजे मी नव्हे, देवानेच ठरवलंय, महापौर महायुतीचाच होईल.  असं असलं तरी अद्याप महापौर आरक्षण सोडत जाहीर झालेली नाही. त्यामुळे महापौर आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मोठी उलथापालथ होऊ शकते. 

महापौर सोडत 

येत्या 22 जानेवारीला महापौर आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. आजच याबाबतची माहिती नगरविकास मंत्रालयाने दिली. सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची  22 जानेवारीला सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. त्यावेळी कोणत्या प्रवर्गाचा महापौर मुंबईच्या खुर्चीत विराजमान होणार हे ठरणार आहे. 

ठाकरेंकडे हुकूमाचे एक्के

महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी सध्याच्या घडीला ठाकरेंकडे दोन हुकूमाचे एक्के असल्याचं चित्र आहे. कारण निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 2 जागा अनुसूचित जमाती अर्थात ST साठी राखीव आहेत. प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन मतदारसंघात सर्वपक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. अशा परिस्थितीत जर 22 जानेवारीला महापौरपदासाठी जी आरक्षण सोडत निघणार आहे, त्यावेळी महापौरपद जर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जाहीर झालं तर ठाकरेंना लॉटरी लागू शकते. 

त्यामुळे जसं उद्धव ठाकरे म्हणाले, त्याप्रमाणे जर "देवाची इच्छा असेल तर महापौर ठाकरेंचा होऊ शकतो. 

'ते' दोन उमेदवार कोण? 

प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन्ही प्रभागात ठाकरेंचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी यांनी बाजी मारली, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे अशोक खांडवेंचा पराभव केला. तर प्रभाग 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला.  प्रियदर्शनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या उदमेवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला. 

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89

शिवसेना ठाकरे गट - 65

शिवसेना - 29

काँग्रेस - 24 

मनसे - 6 

एमआयएम- 8 

एनसीपी - 3 

एसपी - 2 

एनसीपी शप - 1 
--------------
एकूण- 227

महत्त्वाच्या बातम्या

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Embed widget