Zero Hour : धार्मिक ठिकाणं टार्गेटवर, भारत-पाक संघर्ष आणखी किती चिघळणार?
Zero Hour : धार्मिक ठिकाणं टार्गेटवर, भारत-पाक संघर्ष आणखी किती चिघळणार?
India vs Pakistan War: पाकिस्तानने पुन्हा एकदा शुक्रवारी (9 मे 2025 ) नागरी विमान कंपनीच्या नावाखाली भारतातील अनेक भागात ड्रोन हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला ते भूजपर्यंत 26 ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा पाकिस्तानचा अयशस्वी प्रयत्न लष्कराने हाणून पडला आहे. यामध्ये संशयित सशस्त्र ड्रोनचा समावेश होता जे नागरी आणि लष्करी लक्ष्यांसाठी संभाव्य धोका निर्माण करू शकत होते. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पुन्हा एकदा पाकिस्तानचे मनसुबे वरच्या वर हाणून पाडले आहेत. मात्र पकड्यांची खोड काही केल्या मिटत नसल्याचे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे.
या ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न
पाकिस्तानने ज्या ठिकाणी अयशस्वी ड्रोन हल्ले केले त्यात बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला यांचा समावेश आहे.दरम्यान, फिरोजपूरमधील एका नागरी भागाला लक्ष्य करून एका सशस्त्र ड्रोनने हल्ला केला, ज्यामध्ये एका स्थानिक कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले असल्याची माहिती असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
All Shows

































