Zero Hour : डोंबिवलीकरांमध्ये विनाशकारी स्फोटाची दहशत, एमआयडीसी कधी स्थलांतरीत करणार?
नमस्कार मी विशाल पाटील... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत... आजच्या भागात आपण तीन महत्वाचा बातम्या पाहणार आहोत.. पहिली बातमी डोंबिवलीतील विनाशकारी स्फोटाची.. डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल दुपारी झालेल्या स्फोटानंतर बचावकार्य आजही सुरु आहे.. इतकंच नाही तर आज दुपारपर्यंत इथं कालपासून सुरु असलेली आग धुमसत होती.. दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढत होता.. तसं नेत्यांची रीघही लागली होती. याच स्फोटाचे अनेक पैलू आपण पाहणार आहोत..
आता जावूयात डोंबिवलीत.. इथं झालेला स्फोट इतका भीषण होता.. की जिथं स्फोट झालाय.. ज्या अमुदान कंपनीत काल स्फोट झाला तिथं आजही आगीच्या घटना होत्या.. केमिकल कंपनी असल्यानं बचावकार्यातही अनेक अडथळे होते.. शिवाय, ज्वलनशील पदार्थांच्याच कंपन्या आजूबाजूला असल्यानंही बचावकार्य धिम्यागतीनं सुरु होतं.. सकाळपासून इथं दुर्घटनेत मृतांचा आकडा तासांतासाला वाढत होता.. त्याचबरोबर दुर्घटनास्थळावर येणाऱ्या नेत्यांचाही आकडा वाढत होता..
कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दुर्घटनेत सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल झालाय.. मानपाडा पोलिसांनी अमुदान केमिकल्स कंपनीच्या प्रमुख मालती प्रदीप मेहता यांना नाशिकमधून अटक केलीये.. काल स्फोटानंतर मालती मेहतांनी डोंबिवली सोडलं.. नाशकात नातेवाईकांकडे पोहोचल्या.. तिथून पुढे जाण्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं..
तिकडे पोलिसांनी कारवाई केली.. आणि इकडे विरोधकांनी सरकारवर आरोप केला.. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घटनास्थळी जात... कालच्या स्फोटांवरुन सरकारला प्रश्न विचारलााय.. तो आधी पाहुयात..