Zero Hour : लोकसभेच्या आधी नाराजी नाट्याचा सूर ते प्रफुल्ल पटेलांची EXCLUSIVE मुलाखत
Zero Hour : लोकसभेच्या आधी नाराजी नाट्याचा सूर ते प्रफुल्ल पटेलांची EXCLUSIVE मुलाखत राज्यात राजकीय तापमान तवाढत असताना, अजून एक लाट सुरु झालीय
ती म्हणजे नाराजवीरांची .. कोणी उमेदावारी मिळाली नाही म्हणून नाराज.. तर कुणी असलेली खासदारकी धोक्यात आलं म्हणून नाराज.. तर कुणी हक्काची जागा आघाडी धर्मापोटी सोडावी लागतेय.. म्हणून नाराज.. कुणी जुन्या वादातून नाराज.. तर कुणी भविष्यातील संघर्षामुळे नाराज.. पण आजची नाराजी सगळ्यात मोठी बातमी हि कोना व्यक्तीची नसून ...थेट एका राष्ट्रीय पक्षाची आहे ...आणि ह्या नाराजीमुळे महाविकास आघाडीचं धोक्यात आल्याचे चित्र आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार घोषित करून टाकल्यामुळे काँग्रेसने तर आज थेट सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई अशा तीन जागांवर मित्र पक्षांचे उमेदवार अल्स तरी मैत्रीपूर्ण लढतीत आपले हि उमेदवार उतरवण्याची तयारी दाखवली ...काय काय झाले पुढे हे आपण ह्या भागात बघणार आहोतच दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हि महायुतीतील नाराज नेत्यांनी गर्दी आजही कायम आहे.. रत्नागिरी सिधुदुर्गातून शिवसेनेचे किरण सामंत असो.. की बारामतीसाठी हर्षवर्धन पाटील असो.. दीपक केसरकर, रामदास आठवले असे बऱ्याच नेत्यांनी आज फडणवीसांची भेट घेतली.. तिकडे अमरवतीत सुरु झालेला राणा विरुद्ध अडसूळ, बच्चू कडू संघर्ष नव्या वळणावर पोहोचलाय... बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने थेट नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उतरवण्याचे जाहीर करत दिनेश बुब यांना उमेदवारी पण जाहीर करून टाकली ... पाहुयात बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका
All Shows

































