एक्स्प्लोर

Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद

Akola Crime News: समलिंगी नात्यातील संशय आणि वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात उघडकीस आली आहे.

Akola Crime News अकोला: पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना (Akola Crime News) समोर आली आहे. समलिंगी नात्यातील संशय आणि वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत 30 वर्षीय किरन (नाव बदलले आहे) या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या नितेश अरुण जंजाळ (रा. संजय नगर, मोठी उमरी) याने हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी नितेशला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं काय घडलं? (Akola Crime News)

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर येथे आज सकाळी अचानक नितेश जंजाळ हा घराबाहेर येत जोरजोराने आरडाओरड करू लागला. “किरन (नाव बदलले आहे) खाली पडला असून तो मरण पावला आहे,” असे सांगत त्याने परिसरातील नागरिकांना घटनास्थळी जमा केले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घराची तपासणी केली असता किरनच्या (नाव बदलले आहे) अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या. डोक्यावर आणि तोंडावर जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसून आल्याने पोलिसांना हत्या झाल्याचा संशय आला.

पोलिस तपासात उघडकीस आली हत्या-

पोलिसांनी नितेश जंजाळची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, किरनसोबत (नाव बदलले आहे) राहत असलेल्याच नितेशने त्याची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, लाठी-काठीने डोक्यावर आणि तोंडावर जोरदार वार करण्यात आल्याने किरनचा (नाव बदलले आहे) मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नात्यातील संशय ठरला कारण?- (Akola Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, किरन (नाव बदलले आहे) आणि नितेश जंजाळ हे दोघेही मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. सुरुवातीला चांगली मैत्री असलेल्या या दोघांचे नाते पुढे समलिंगी रिलेशनशिपमध्ये बदलले. मात्र, अलीकडील काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. अमोल इतर कोणाशी संबंध ठेवत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडणे होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून समोर आली आहे. काल रात्रीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री उशिरा नितेशने बाहेरून जेवण आणल्यानंतर हा वाद अधिक वाढला आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आरोपी ताब्यात; पुढील तपास सुरू- (Akola Crime News)

पोलिसांनी आरोपी नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Pune Crime News : तीन वर्षापूर्वी पतीचे निधन, विधवा महिलेने जीन्स घातली म्हणून दीरासह सासूने... पुण्यात धक्कादायक घटना

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
Embed widget