Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
Pimpri Chinchwad Election 2026: कोणाच्या जीवावर कोण काय म्हणतंय. आपण रोज जेवतो, कसं सरळ हाताने जेवतो की उलट हाताने जेवतो. निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपला निवडा, असे रवींद्र चव्हाणांनी म्हटले.

Ajit Pawar and Ravindra Chavan Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवार यांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीस यांना, 'पुन्हा एकदा विचार करा', असा सल्ला दिला होता. ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्यासोबत जोडली गेली आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेबांना खासगीत नेहमी सांगायचो, 'साहेब थोडा विचार करा.' पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे (Pimpri Chinchwad Election 2026) कार्यकर्ते मला रोज सांगत आहेत. त्यामुळे थोडासा विचार करा, असे मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना बोललो होतो, असे वक्तव्य भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. अजित पवार यांच्या आरोपांना उत्तर द्यायला पिंपरी चिंचवडमधील भाजपचा एकही स्थानिक नेता पुढे सरसावला नव्हता. त्यामुळे नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा', या आदर्श तत्त्वाने चालणाऱ्या भाजपच्या प्रतिमेविषयी शंका उपस्थित झाली होती. अखेर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी थेट पिंपरी-चिंचवडमध्ये येत भाजपच्या अंगावर येऊ पाहणाऱ्या अजित पवारांना अक्षरश: शिंगावर घेतले.
अजित पवार हे तसे चांगले आहेत. पण काही एजन्सी त्यांना खोटे नरेटिव्ह कसे पसरवायचे, यासाठी स्क्रिप्ट लिहून देतात. अजितदादांनी कोणता शर्ट घालायचा, यासाठीही एजन्सी सल्ला देते. पण अजित पवार हे आमच्यासोबत केंद्र आणि राज्यात जोडले गेले आहेत. पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अजित पवार हे एजन्सीने त्यांना सल्ला दिल्याशिवाय खोटे आरोप करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजप पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक लढवत आहे. मै ना खाऊंगा ना किसी को खाने दुंगा या तत्वाने सरकार चालते. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी चिंता करु नये, निवडणूक संपल्यावर अजित पवार हसतहसत सगळं सोडून द्या म्हणतील. भाजपची संघटनात्मक ताकद पिंपरी चिंचवडमध्ये चांगली आहे. मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली इथे विकासाला गती मिळाली आहे. पण येथील मतदार सुज्ञ आहे, विकासासाठी मतदान करेल, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा महापौर बसेल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा
























