Zero Hour Dhule Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे : धुळ्याचं बकालिकरण कधी थांबणार? ABP Majha
Zero Hour Dhule Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे : धुळ्याचं बकालिकरण कधी थांबणार? ABP Majha
हेही वाचा
तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरु आहे झीरो अवर, चर्चा जनहिताची... म्हणजेच महापालिकेचे महामुद्दे..
तुमच्या आमच्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक मुद्द्यांचा, म्हटलं तर महामुद्द्यांच्या थेट संबंध हा आपापल्या शहरांमधल्या महापालिका आणि नगरपालिकांशी. नजिकच्या काळात महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं तुमच्या आमच्या जीवनातल्या त्याच महामुद्द्यांवर आम्ही गांभीर्यानं प्रकाशझोत टाकत आहोत. झीरो अवरच्या महापालिकेचे महामुद्दे या खास सेगमेन्टमध्ये. सुरु करुयात महापालिकेचे महामुद्दे...
मंडळी, चालणं हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालंय. पण आजच्या जमान्यातल्या आपल्या शहरांमध्ये चालणं ही अतिशय अवघड कला होऊन बसलीय. त्यामागं अनेक कारणं आहेत, पण सर्वात मोठं कारण आहे फेरीवाले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर शहरांमधल्या कुठल्याही रेल्वे स्थानकाजवळ जा, तुम्हाला एकसारखंच चित्र दिसेल. आधीच अरुंद असलेले फुटपाथ, त्यावर शेकडो फेरीवाले. फुटपाथच्या खालून चालायचं म्हटलं तर वाहनांचा धोेका. पण या फेरीवाल्यांचं करायचं काय? राज्यातली कुठलीही महापालिका फेरीवाल्यांच्या समस्येवर उपाय का काढू शकलेली नाही? या सगळ्याची उत्तरं आपण पाहणार आहोत, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरारबद्दलच्या स्पेशल रिपोर्टमधून.