Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे: राज्यातील राजकारणाच्या बातम्या सुपरफास्ट : 30 August 2024
मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी...छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होऊन मागितली माफी
पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही, मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन..२०१९मधील सरकारनं या बंदराला विरोध केला, नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा
बंदराच्या रिक्लेमेन्शनसारखं या ठिकाणी विमानतळासाठीही रिक्लेमन्शन करावं, मुंबईतील तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं, देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी
अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, महाराजांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याची ग्वाही...
संजय राऊतांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप, कुणाचा वरदहस्त होता अशीही विचारणा...
इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी काय घेतली, हर्षवर्धन पाटलांचा सवाल, भाजपनं माझ्या अनुभवाचा उपयोग करुन घेतला नाही अशी खदखद...
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला अटक, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई ...